निरमाच्या जाहिरातीतील मुलीच्या चेहऱयावर नेत्यांचे चेहरे

मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केला की भ्रष्टाचारी नेते निरमा वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुतल्यासारखे स्वच्छ होतात अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. आता निरमाच्या जाहिरातीतील मुलीच्या चेहऱयावर या नेत्यांचे चेहरे लावलेले पोस्टर्स देशात झळकू लागले आहेत.

आसामच्या गुवाहाटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेली ही पोस्टर्स चर्चेचे केंद्रबिंदू बनली आहेत.आसाममधील पारंपरिक ‘रोंगाली बिहू’ उत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी येणार आहेत. त्यांच्या मार्गावरच गुवाहाटीतील राजीव भवन भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्या पोस्टर्सवर निरमा गर्लच्या चेहऱयाच्या जागी भाजपमध्ये गेलेले हिमंता बिस्वा सरमा, नारायण राणे, सुवेंदू अधिकारी, सुजना चौधरी, ईश्वरप्पा, ज्योतिरादित्य शिंदे, अर्जुन खोतकर यांचे चेहरे लावण्यात आले आहेत. अशीच पोस्टर्स तेलंगणातील हैदराबादमध्ये लावण्यात आली होती.

🤙 8080365706