गड किल्यांवरील ऐतिहासिक वास्तू संवर्धन गतिमान करणे कामी प्रयत्नशील-खा.अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन

समाधीस अभिवादन करून पायऱ्या टप्पे करण चा श्रीफळ वाढवून व कुदळ मारून शुभारंभ प्रसंगी खा.अमोल कोल्हे व नाभिक महामंडळाचे पदाधिकारी(छाया:रामचंद्र काशिद)

वीर शिवा काशीद समधीस्थळी पायऱ्या टप्पे करण भूमिपूजन शुभारंभ संपन्न

पन्हाळा: गड किल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खाते आणि प्रशासन यांच्यात सुसूत्रात असणे गरजेचे असून पुढाकार घेऊन सुलभता निर्माण करून गड किल्यांवरील ऐतिहासिक वास्तू संवर्धन गतिमान करणे कामी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खा.अमोल कोल्हे यांनी पन्हाळा येथे केले.

ते पन्हाळा पायथ्याशी नेबापूर येथील वीर शिवा काशीद समाधी स्थळी पायऱ्या टप्पे करण शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी खा.कोल्हे यांच्या खासदार फंडातून दहा लाखाचा मंजूर निधी मुख्य रस्ता ते समाधी पर्यँत पायऱ्या टप्पे करण चे भूमिपूजन खा. कोल्हे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून-कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला. सुरवातीला खा.कोल्हे यांनी वीर शिवा काशीद समाधीला अभिवादन केले. पुढे बोलतान खा.कोल्हे यांनी स्वराज्यासाठी अनेख मावळ्यांचे बलिदान आहे.च्या पैकी शिवा काशीद एक आहेत.शिवा काशीद यांच्या स्मारक स्थळाला माझ्या कडीलफंडातील दहा लाखाचा निधी खर्ची करण्याचे मला मोठं भाग्य लाभले.असे म्हणाले.स्मारकासाठी आणखी निधी देऊन अशी ग्वाही दिली.यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळांच्या वतीने समाधी परिसरात सेन्सरवर चालणारे सोलर दिवे व कँप्टस गार्डन आणि समाधी परिसर खचू नये म्हणून उपाय योजनांच्या अनुषंगाने खा.कोल्हे याना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मुख्यधिकरी चेतनकुमार माळी.विजय दाभोळकर, सयाजी झुंझार,मारुतीराव टिपूगडे, बाबासाहेब काशीद, विजय संकपाळ,विवेक सूर्यवंशी, संतोष चव्हाण,सुनिल, इंगळे,निशांत मोहिते, दिगंबर टिपूगडे, विवेक रोकडे, रवींद्र काशीद, सदाशिव सूर्यवंशी, दगडू काशीद,प्रवीण काशीद,आनंदा काशीद,भीमराव काशीद,रामचंद्र काशीद,बाबा माने व जिल्हयातील नाभिक बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.

🤙 8080365706