
मुंबई : महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.
मी जरा बारकाईने बघितलं. हे बावनकुळे महाराष्ट्रातले पण दिसतात वेस्ट इंडिजच्या प्लेअरसारखे. मग कोण म्हणलं व्हिव्हियन रिचर्ड्स, पण तो मजबूत होता.पॅट्रिक पॅटर्सन दिसतो तसा हा दिसतो का? नाही. कोर्टनी वॉल्शसारखा दिसतो का नाही? ब्रायन लारा दिसतो का?नाही. मग माझ्या लक्षात आलं हा एम्ब्रोस दिसतो. जुन्या लोकांना माहिती असेल एम्ब्रोस कसा दिसतो ते. कदाचित बावनकुळे त्यांना लाजवतील’, असं भास्कर जाधव म्हणाले.
