…..तेव्हा आम्हाला हाकलून लावण्यात आलं; एकनाथ खडसे

बुलडाना : पूर्वी भाजपमध्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी ते भाजपमध्ये असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. भाजपच्या उमेदवारासाठी आम्ही मत मागण्यासाठी गेलो होतो, तेव्हा आम्हाला हाकलून लावण्यात आलं, आम्हाला पळताभूई थोडी झाल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

आम्ही गेल्या निवडणुकीमध्ये मलकापूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्यासाठी मत मागण्यासाठी गेलो होतो, तेव्हा आम्हाला एका वृद्धाने हाकलून लावल्याचं खडसे म्हणाले आहेत. खडसे यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं काय म्हणाले खडसे? एकनाथ खडसे यांनी 2019 सालच्या विधानसभेचा एक किस्सा सांगितला आहे.तेव्हा खडसे हे भाजपमध्ये होते. ते मलकापूरमध्ये भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्यासाठी मत मागण्यासाठी गेले होते. तेव्हा घडलेला एक किस्सा खडसे यांनी सांगितला. खडसे म्हणाले आम्ही मत मागण्यासाठी गेलो पण आम्हाला तिथून हाकलून लावण्यात आले, त्या घरात असलेल्या वृद्धाने आम्हाला हाकलून लावले, ते म्हणाले की तुम्ही फक्त भूमिपूजन करता पण काम काही करत नाहीत.

🤙 8080365706