कापसाला चांगला भाव…

धुळे : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कापसाचे दर ७०० ते हजार रुपये प्रति क्विंटल मागे वाढल्यामुळे शेतकरी आनंदी आहे.

धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात सांभाळून ठेवला होता. गेल्या चार महिन्यांपासून कापसाचे दर हे 8 हजार रुपयांच्या पुढे जात नव्हते. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचे दर हे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील. मात्र दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी वाढल्याने दर चांगले मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत कापूस बाजारपेठेमध्येही तेजी निर्माण झाली आहे.

🤙 8080365706