आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले?

तुम्हाला माहित आहे का मीठ आणि संधैव मीठ यापैकी कोणते मीठ आरोग्यासाठी चांगले आहे.

जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.सैंधव मीठ आणि पांढऱ्या मीठाच्या चवीत फारसा फरक नसतो, परंतु जे लोक आरोग्याबद्दल जागरूक असतात ते सैंधव मीठ खाणे पसंत करतात. या दोन मिठांमध्ये केवळ रंगाचा फरक नाही, तर दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यावर परिणाम करतात.

सैंधव मीठाचा मुख्य स्त्रोत समुद्र किंवा खारट पाण्याचे तलाव आहेत. जे सोडियम क्लोराईडचे रंगीत स्फटिक तयार करतात. हे मीठ शुद्ध मानले जाते कारण ते तयार करण्यात कोणतीही छेडछाड होत नाही आणि ते शुद्ध स्वरूपात आढळते.साधे, पांढरे मीठ तयार करण्यासाठी मीठ परिष्कृत केले जाते. यात 95 टक्क्यांहून अधिक मीठ असते. त्यात आयोडीनसह आणखी अनेक गोष्टी असतात. याच कारणामुळे पांढरे मीठ आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. पांढरे मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे साध्या पांढऱ्या मीठाचे सेवन कमी करावे.

🤙 8080365706