गगनबावडा तालुक्यात वादळी पाऊस , घराचे पत्रे उडाले

साळवण प्रतिनिधी :(एकनाथ शिंदे ) गगनबावडा तालुक्यात काही ठिकाणी काल शनिवारी जोरदार वाऱ्यासह मान्सून पूर्व वळवाचा पाऊस झाला. सायंकाळी 7 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर पडला. हा पाऊस ऊस पिकाला पोषक आहे. परंतु जोरदार वाऱ्यामुळे तालुक्यातील वेतवडे येथील अनेकांच्या घरांची छप्परे उडून गेली. ..

..वेतवडे येथील आनंदा पांडुरंग शिंदे, जनार्दन गुंडू शिंदे , रामचंद्र लक्ष्मण शिंदे व गोरख शाहू शिंदे यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेले. यामध्ये गोरख शिंदे यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेले. त्याचबरोबर शेतातील बांधावरील फणस, आंबा व नारळ ही झाडे मोडून पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भात पेरणी साठी जे काही तरवे केले जातात भाजके तरवे त्यांना लागणारा पालापाचोळा गोवऱ्याही भिजून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे भात पिकाचे तरवे भाजणे लांबणीवर गेले.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा आणि रात्रीच्या वेळी ढगाळ वातावरण असे वातावरण होते. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. दरम्यान, गगनबावडा तालुक्यात काल सायंकाळी 7 च्या सुमारास काही ठिकाणी मोठा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तब्बल तासभर झालेल्या पावसाने गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. व पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले.

वादळी वाऱ्याने व पावसाने झालेल्या पडझडीचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्याच्या पूर्वेकडून आलेला हा पाऊस तालुक्यातील अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात झाला.

🤙 8080365706