‘या’ गोष्टी केल्याने रक्तातील साखर राहील नियंत्रित

बदलत्या लाईफस्टाईलमुळे कमी वयात गंभीर आजार शरीरात उद्भवतात. ज्यात डायबिटिज, हृदयविकाराचा धोका, ब्लड प्रेशर कमी – जास्त होणे, या आजारांचा समावेश आहे.रात्री झोपण्यापूर्वी चार गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येईल.

रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा प्या, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅमोमाइल चहा ही एक औषधी वनस्पती आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.बदामामध्ये भरपूर पोषक असतात. रात्री झोपण्यापूर्वी ७ भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असते. ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. भिजवलेले बदाम खाल्ल्यानंतर रात्री भूक देखील लागत नाही.मेथीच्या दाण्यांमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात. जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेले मेथीचे दाणे खा, यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शांत झोप घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये चार पद्धतींचा समावेश करा, ज्यामुळे ब्लड शुगर रेगुलेट करण्यास मदत मिळेल.

🤙 8080365706