
मुंबई : महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ५० खोके, एकदम ओक्के असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केलं. काही दिवसांपूर्वी यावर एक रॅपही व्हायरल झाला होता. आता, या रॅपरला अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर एका मराठी तरुणाने रॅप बनवला आहे. त्याने आपल्या रॅपमधून शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ह्या रॅपरचा व्हिडिओ शेअर करत या तरुणाला अटक करु नका, असे म्हटले होते. मात्र, अंबरनाथ पोलिसांत तक्रार झाल्यानंतर आता या रॅपर राम मुंगासेला अटक करण्यात आलीय. मराठवाड्याच्या जालन्यातील पोलिसांनी रॅपरला अटक केली असून त्यास आता अंबरनाथ पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.
