गॅस शेगडी साफ करण्याची सोपी ट्रिक…

गॅस शेगडी ही किचनमधली सर्वात घाण होणारी गोष्ट असून ती साफ करणे हा एक मोठा टास्क असतो. शेगडीवर आपण स्वयंपाक करत असल्याने त्यावर सतत दूध, फोडणी आणि इतर काही ना काही सांडत असते. यामुळे शेगडी आणि बर्नर, त्याच्या आजुबाजचा भाग खराब होतो. चला तर मग पाहूया गॅस शेगडी साफ करण्याची सोपी ट्रीक कोणती?.

१. एका बाऊलमध्ये आवश्यकतेनुसार बेकींग सोडा घ्या.२. त्यामध्ये हा सोडा भिजेल आणि चांगली पेस्ट तयार होईल इतकेच व्हिनेगर घाला.३. व्हिनेगर घातल्यानंतर यामध्ये भरपूर बुडबुडे येतील. ४. मग गॅस शेगडीवरुन बर्नर, बाजूच्या प्लेटस हे सगळे बाजूला काढायचे. ५. शेगडीवर ज्याठिकाणी खराब झाली आहे तिथे आपण तयार केलेली पेस्ट घालायची.. स्क्रबरच्या मदतीने ही पेस्ट गॅस शेगडीवर पसरवायची. ७. त्यानंतर २० मिनीटे ही पेस्ट शेगडीवर आहे तशीच ठेवायची. ८. २० मिनीटांनंतर गॅस स्क्रबरने स्वच्छ घासायचा.९. त्यानंतर ओल्या फडक्याने शेगडी स्वच्छ पुसून घ्यायची, मग ती एकदम चकाचक दिसते. 

🤙 8080365706