खोट्या तक्रारी दाखल करून कारखाना प्रशासनाच्या बदनामीचा प्रयत्न : अमल महाडिक

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचाराची मर्यादा ओलांडली असून राजाराम कारखाना प्रशासनाची नाहक बदनामी चालवली आहे, असा आरोप मा.आ. अमल महाडिक यांनी केला.

कडवे ता.शाहूवाडी येथे त्यांनी आज सभासदांशी संवाद साधला. सुट्टीच्या दिवशी तसेच रात्री-अपरात्री कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याचे प्रकार विरोधकांकडून होत आहेत, यावर कळस म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात कारखाना प्रशासनाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. कारखाना प्रशासनाने खोटी माहिती दिल्याचा धादांत खोटा आरोप या तक्रार अर्जात करण्यात आला आहे. निवडणूक यंत्रणा आणि कारखाना प्रशासन या दोघांवर दबाव आणण्याचे षडयंत्र विरोधकांकडून सुरू आहे, पण आम्ही सर्व संचालक व सर्व सभासद कारखाना प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.” अशा शब्दात अमल महाडिक यांनी विरोधकांना खडसावले. निवडणुकीत कारखाना प्रशासनाला ओढणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे . विरोधकांकडे थोडी देखील नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी खोट्या तक्रारी देण्यापेक्षा निवडणूक रिंगणात समोर येऊन लढावं असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

यावेळी संजय पाटील, तुकाराम पाटील, राजाराम पाटील ,विश्वास पाटील, मारुती पाटील, मानसिंग पाटील ,धोंडीराम पाटील ,विष्णु सावंत ,दगडू सावंत, पांडूरंग पाटील, हेंमत पाटील ,आनंदा पाटील, यशवंत पाटील, जयसिंग पाटील, गोपाळ पाटील, गोविंद पाटील, लक्ष्मण पाटील, यशवंत आगरे, बाळू यादव , राजाराम पाटील, संजय कोलते, आंनदा खोत, प्रकाश पाटील, शंकर कदम, हरी पाटील, गणशे शेळके, तुकाराम कदम यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706