जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या जंगम मालमत्तेच्या जप्तीला उद्यापर्यंत स्थगिती

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ व कुरुंदवाड नगरपरिषद यांच्यात जमिनीचा वाद होता.याचा न्यायालयीन निकाल वसंत संकपाळ यांच्या बाजूने लागून 2019 रोजी न्यायालयाने नुकसान भरपाई तीन महिन्याच्या आत द्यावी असा आदेश दिला होता .

या आदेशानुसार कुरुंदवाड नगरपरिषद व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोणतीही अंमलबजावणी केली नाही.अंमलबजावणी केली नाही म्हणून त्यांनी अर्ज करून न्यायालयाकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्ती व्हावी अशी मागणी केली होती.त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने दिवाणी न्यायाधीश जयसिंगपूर यांनी जप्तीचे आदेश दिले होते.

आज दिवसभर वसंत संकपाळ व त्यांचे वकील ॲड.देवराज मगदूम आपल्या सहकारी वकीलांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठाण मांडून बसले होते.पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.यामुळे आज प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.जप्तीला स्थगिती आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कोर्टाकडे अर्ज केला होता.शेवटी संध्याकाळी 6 वाजता उद्या 11 वाजेपर्यंत पर्यंत स्थगिती मिळवण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला अखेर यश आले आहे.तरीही शासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाला चांगलीच चपराक बसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

🤙 8080365706