अंधाराचा फायदा घेत विरोधकांचा राजाराम कारखान्यात भुरट्या चोरासारखे घुसण्याचा विरोधकांचा प्रयत्न – अध्यक्ष दिलीप पाटील

कोल्हापूर : राजाराम कारखान्याची निवडणूक रंगात आली असताना मंगळवारी रात्री एक खळबळ जनक प्रकार उघडकीला आला आहे विरोधी आघाडीच्या वीस ते पंचवीस जणांनी रात्रीच्या अंधारात कारखान्यात जबरदस्ती घुसून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना दमदाटी करून घुसलेल्या विरोधकांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे अशी टीका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली. लोकशाहीच्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांनी काल मात्र आपले खरे रूप दाखवून दिले. राजाराम कारखाना कार्यस्थळावर रात्री अकराच्या सुमारास कारखान्याचे प्रमुख कार्यालय फोडून कागदपत्रे लंपास करण्याचा त्यांचा बेत होता असा आरोप दिलीप पाटील यांनी केला.

सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच त्यांना आल्या पावली धुम ठोकावी लागली. एक प्रकारे निवडणुकीपूर्वीच कारखान्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय . मुद्दाम सुट्टीच्या दिवशी आणि रात्री अप रात्री येऊन कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये दहशत वाजवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचेही दिलीप पाटील यांनी सांगितले.

सभासदांच्या हक्काची भाषा करणाऱ्या विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जायला हवं होतं पण आपला पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आता गुंडगिरीवर उतरले आहेत अशी टीका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.मंगळवारी रात्री कारखाना कार्यस्थळावर घडलेला हा प्रकार भानामतीचा असल्याची चर्चा उपस्थित यामध्ये सुरू होती.या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी राजाराम कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि शिष्ट मंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांची सायंकाळी सहा वाजता भेट घेणार आहे.

🤙 8080365706