आ. पी. एन. पाटील ईडीच्या रडारवर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत.

पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ते आज स्वतःहून मुंबई येथील ईडी कार्यालयात दाखल झाले. मात्र, आज त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समाज बजावून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. 

🤙 8080365706