
मुंबई : कोरोनाची साथ पसरून रुग्ण वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क करतानाच उपायांची तयारी सुरू केली आहे. ‘सध्या मास्क बंधनकारक नसले; तरी कोरोनाच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
संशयित व्यक्तींच्या चाचण्यापासून सर्व प्रकारची उपचार सुविधा वेळेत देऊन खबरदारी घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासोबतच रुग्णांवर लक्ष ठेवून सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच यांना लक्षणे जाणवत आहेत, अशा व्यक्ती मास्क वापरून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तूर्त मास्क बंधनकारक नसला तरी, गर्दीच्या ठिकाणी तो वापरावा, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
