राजारामचे सभासदच विरोधकांचा काटा काढतील: अमल महाडिक

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ कणेरी, कणेरीवाडी गावांमध्ये माजी आमदार अमल महाडिक यांचा दौरा पार पडला. यावेळी सभासदांच्या बैठका घेत त्यानी सभासदांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “कारखान्याच्या सुज्ञ सभासदांना राजारामच्या वजन काट्यावर पूर्ण विश्वास आहे. अगदी कुठल्याही काट्यावर वजन करून ऊस घातला तरी किलोचाही फरक आढळणार नाही. विरोधकांनी आरोप केला असेल मात्र त्यांच्या कारखान्याप्रमाणे आपल्याकडे १२०० किलोचा एक टन नसतो.”तसेच आता त्यांना लक्षात आलं कि काट्याचा मुद्दा पण चालणार नाही तर नवीन मुद्दा घेऊन दिशाभूल करतील. कारण दिशाभूल करणं हाच त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे. असंही अमल महाडिक यांनी नमूद केलं. यावेळी बोलताना गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सुडाचे राजकारण करण्याची ज्यांची परंपराच आहे अशा विरोधकाना आता सभासद त्यांची जागा दाखवतील. याच शेतकऱ्यांच्या मुलांकडून डोनेशन घेऊन साम्राज्य उभं करणारे आज शेतकऱ्याचा कळवळा दाखवत आहेत, असा टोलाही तानाजी पाटील यांनी लगावला.यावेळी शिवाजीराव पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग खोत, बाजीराव खोत, अर्जुन इंगळे, मधुकर पाटील, दत्तात्रय पाटील, चंद्रकांत शिंदे, आनंदराव माळी, दत्तात्रय यादव यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.

🤙 8080365706