रोशनी शिंदे यांनी केवळ मीडियासाठी बाऊ केला; मीनाक्षी शिंदेमीनाक्षी शिंदे

पुणे : पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावर शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.रोशनी शिंदे यांना मारहाण झालेलीच नाही, केवळ मीडियासाठी याचा बाऊ केला गेला, असा आरोप शिवेसनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, हा प्रकार झाला त्याचा उगाचच बाऊ करण्यात आला. त्या मुलीला केवळ समजावायला आमच्या मुली गेल्या होत्या त्या ठिकाणी कुठलीही मारहाण झालेली नाही. या गोष्टींचा फक्त मीडियासाठी बाऊ केला जात आहे. एका मुलीला पुढे करुन ठाकरे गटाकडून शिवसेनेवर वारंवार आरोप केले जात आहेत. पण तुम्ही फुटेज पाहिलं तर त्यात हे दिसतंय की तिला मारहाण झालेली नाही. तिच्या पोटावर लाथा मारल्या हा आरोपही खोटा आहे. एमएनसी रिपोर्टमध्ये असा कुठलाही दावा करण्यात आलेला नाही.

🤙 8080365706