
पुणे : पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. रोशनी शिंदे असं या मारहाण झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे.
त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. यावर आता रोशनी शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, पण फक्त अर्ज दाखल करून घेण्यात आला. रुग्णालयात तपासण्यासाठी गेलो, तर तिथे दाद देण्यात आली नाही. सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांना छळण्यासाठी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार घेऊन पुढे चाललो, असे सांगता. मग, एखाद्या महिलेला चक्कर येईपर्यंत मारहाण करतात, ही अमानुष घटना आहे. उद्या त्या मुलीला काही झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल,” असे राजन विचारे यांनी सांगितले आहे.
