कडीपत्याच्या पानाचा आरोग्यदायी उपयोग….

कडीपत्ता हा तर अनेक पदार्थांना फोडणी देताना आवर्जून वापरला जाणारा घटक. यामुळे पदार्थाचा स्वाद तर वाढतोच पण त्याची पौष्टीकता वाढायलाही मदत होते. तर जाणून घेऊयात कडीपत्याच्या पानाचा आरोग्यदायी उपयोग.

एकतर कडीपत्त्याची पाने चावून खावीत. नाहीतर ग्लासभर पाण्यात कडीपत्ता ५ ते ७ मिनीटे चांगला उकळून मग त्याचे पाणी कोमट झाल्यावर प्यावे. यामुळे कडीपत्त्याचा सगळा अर्क आपल्याला मिळण्यास मदत होते. कडीपत्त्याचा हेअर पॅक, कडीपत्त्याचे तेल यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यास केस गळणे कमी होण्यास मदत होते. तसेच केस पांढरे झाले असतील तरी कडीपत्त्याच्या पानांचा चांगला फायदा होतो. केसांतील उवा-लिखा घालवण्यासाठीही कडीपत्त्याची पेस्ट ताकात मिसळून लावल्यास ही समस्या दूर होते. कडीपत्त्याची साधारण ३० पाने घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यामध्ये ताक घालून हे मिश्रण प्यायल्यास जुलाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवा आणि वाळवा. त्यानंतर अर्धा चमचा तूपामध्ये ही पाने चांगली परतून घ्या आणि चावून खा. 

🤙 8080365706