
सोलापूर : सध्याच्या प्रचलित शैक्षणिक पद्धतीत झेडपी शाळांवरील (प्राथमिक) शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारकशिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे.मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे.
त्यात स्पेशलायझेशन असणार आहे.केंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना शेवटच्या सेमिस्टरवेळी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यास त्यासंबंधीची सहा महिने ॲप्रेटायशेन, इंटरशिप करावी लागेल. त्यानंतर तो नोकरी किंवा व्यवसायात उतरू शकतो. सध्या सर्वच अकृषिक विद्यापीठांनी कोर्स स्टक्चर तयार केले आहे.
