काँग्रेस नेते राहुल गांधी आज शिक्षेच्या निर्णयाला सुरत सत्र न्यायालयात देणार आव्हान

मुंबई : सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ या 2019 मधील विधानावरून दाखल मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.23 मार्च रोजी हा निकाल लागला. त्यानंतर 11 दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आज, सोमवारी या निर्णयाला सुरत सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. राहुल त्यासाठी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहणार आहेत.

राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर काही वेळातच जामीनही मंजूर करण्यात आला होता. तसेच अपिलात जाता यावे म्हणून शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. मात्र राहुल यांनी लगेचच शिक्षेला आव्हान न देता 11 दिवस थांबून याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या सुरत सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले जाणार आहे, असे सांगण्यात आले.

🤙 8080365706