दिवाळी पाडव्याला सभासदांच्याच हस्ते कारखान्याच्या विस्तारीकरणाचा नारळ फोडणार:अमल महाडिक

कोल्हापुर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे माजी आमदार अमल महाडिक यांनी नुकत्याच पन्हाळा तालुक्यातील येवलुज आणि बाजार भोगाव परिसरातील सभासदांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी कारखाना सभासदांच्या मालकीचा असून भविष्यात मोठी झेप घेण्यास सज्ज आहे असं नमूद केलं. कारखान्याला को जनरेशन आणि गाळप क्षमता विस्तारीकरणासाठी परवानगी मिळाली असून येणाऱ्या दिवाळी पाडव्याला सभासदांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठीच राजाराम कारखाना कार्यरत असून सभासदांनी सत्ताधारी सहकार आघाडीवर विश्वास दाखवला आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचं अमल महाडिक यांनी सांगितलं.यावेळी संतोष पाटील, पांडुरंग पाटील, सरपंच बाजीराव पाटील, बळवंत करचे, वसंत गोरे, शिवाजी पाटील, भिवाजी कोले, पांडुरंग पाटील, मोहन हेर्डेकर, युवराज पाटील, शंकर पाटील, हरिश्चंद्र हेर्डेकर, रोहन गुरव,अमर धनवड, बाजीराव पाटील (नाना) इंद्रजीत पाटील उपस्थित होते.

🤙 8080365706