
पुणे : पीपीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह पोस्टाच्या योजना आणि महिला सन्मान योजनांसाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे.
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पॅन आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्यावेळी जर आधार क्रमांक नसेल तर नाव नोंदणी केल्याची स्लिप देण्याची मुभा आहे. पुढे मात्र सहा महिन्याच्या आत खात्याला आधार क्रमांक जोडावा लागेल.पोस्टामध्ये गुंतवणूक खाते उघडतांना पॅन किंवा फॉर्म ६० भरणे आवश्यक आहे. खाते उघडतांना पॅन सबमिट केलेले नसल्यास दोन महिन्यांच्या आत ते देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खाते गोठवले जाणार आहे. केवळ पोस्ट ऑफिसच नाही तर बँकेतही हे नियम लागू करण्यात आलेले आहेत.
