राजकारणातून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नाही : नितीन गडकरी

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारणातून संन्यास घेण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र राजकारणातून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच यावेळी त्यांनी माध्यमांनाही सल्ला दिला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरातील कार्यक्रमात एक वक्तव्य केले होते. जेव्हा मते दिली पाहिजेत असे लोकांना वाटेल, तेव्हाच मते द्या, असे विधान केले होते. यावरून नितीन गडकरी हे राजकारणातून संन्यास घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द नितीन गडकरींनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजकारणातून संन्यास घेण्याचा माझा कोणताही विचार नाही. माध्यमांनी वृत्तांकन करताना अशा वेळी जबाबदारीने करावे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिला.

🤙 8080365706