
पंख्यातील काळपट डाग लवकर निघत नाही, जर पंखा पांढऱ्या रंगाचा असेल तर, आणखी खराब दिसतो. या घरगुती उपायांचा वापर करून पाहा, यामुळे पंखा लवकर साफ होईल, व नव्यासारखा चकचकीत दिसेल.
अनेकदा लोकं पंखे साफ करताना थेट ओल्या कापडाचा वापर करतात, जे चुकीचे आहे. त्यामुळे पंख्यावर कोरडी माती जमा होते, व पंखा अधिक घाण होतो. पंखा साफ करताना प्रथम कोरड्या कपड्याने स्वच्छ करा, शक्य तितकी धूळ काढून टाका, मगच पंखा स्वच्छ करा.पंख्यावरील काळे डाग सहसा ओल्या कापडाने निघत नाही. यासाठी डिटर्जंट आणि लिंबाचा वापर करा. एका वाटीत पाणी घ्या, त्यात १ चमचा डिटर्जंट आणि लिंबाचा रस मिक्स करा. आता हे द्रव एका स्प्रे बाटलीत भरा, पंखा साफ करताना मिश्रण पंख्यावर स्प्रे करा, व कापडाने पुसून काढा.बेकिंग सोड्याचा वापर आपण अनेक कारणांसाठी करतो. पंखा साफ करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हा एक उत्कृष्ट क्लीनर आहे. यासाठी कोमट पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. तयार सोड्याचं पाणी पंख्यावर शिंपडा. व ओल्या कापडाने पंखा साफ करा
