रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू

भोपाळ: मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळूल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडल्याची घटना घडली. त्यापैकी आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये 10 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

🤙 8080365706