कागल येथे श्रीराम नवमी सप्ताह परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा

कागल : श्रीराम मंदीर, कागल येथे चालू वर्षी “चैत्र गुढी पाडवा” ते ” श्रीराम नवमी” या पर्व काळात भव्य दिव्य परमार्थीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीराम नवमी उत्त्सव विविध उपक्रमांनी साजरा झाला.

“नामावतार” “ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज ” चरित्र आणि चाड्मय लेखक प्रा. के. वि. बेलसरे यांच्या दिव्य ग्रंथावर आधारित या सप्ताहात प्रवचन मालिकाचे आयोजन केले होते.भाविक भक्तांनी उस्पूर्तपने सहभाग घेतला श्रीरामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आज प्रभू श्रीराम जयंती दिनी श्रीराम मंदिर येथे दुपारी 12.00 वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा विधिवत पार पडला. महिलांनी पाळणा गायन केले.तर विधिवत पूजा व महाआरती कागल जनक घराण्याचे कागल सिनियर राजे प्रवीणसिंह घाटगे,श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, सौ नंदितादेवी घाटगे ,राजे समरजितसिंह घाटगे,सौ नवोदिता घाटगे,राजे वीरेंद्रसिंह घाटगे,सौ. श्रेयादेवी घाटगे,युवराज आर्यवीर घाटगे यांच्या उपस्थितीत पार पडली. सायंकाळी 5 वाजता प्रभू श्रीराम यांच्या भजनावर आधारीत भरतनाट्यम कार्यक्रम पार पडला.भरतनाट्यम स्पर्धेला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. विजेत्याना राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदीता घाटगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.यावेळी, नगरसेविका सौ विजया निंबाळकर, सौ नम्रता कुलकर्णी, सौ,सुधा कदम, सौ शीतल घाटगे, सौ नंदा गाडेकर आदी,महिला उपस्थित होत्या. नऊ दिवस चाललेल्या या श्री राम नवमी उत्सवास भाविकांनी व महिला वर्गानी मोठी गर्दी केली होती.

🤙 8080365706