कोल्हापुरात ‘मोदी हटाव,देश बचाव ‘ बॅनर लागले आणि हटवलेही

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज (३० मार्च) सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर्स लागल्याचे समोर आले आहे. काही वेळाने हे बॅनर हटवलेही गेले आहेत.

कोल्हापूर शहरातील जनता बाजार चौक, माऊली चौक, पार्वती टॉकीज यासारख्या महत्त्वाच्या चौकात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ बॅनर लावण्यात आले होते. देवकर पाणंद परिसरात लावलेला याच आशयाचा फलक मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या एका नागरिकाने फाडून टाकला. कोल्हापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी ‘मोदी हटाव, देश बचाओ’ बॅनर लावले आहेत.

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनाला आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिरण्यास गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेचा विषय बनला होता.हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते.

🤙 8080365706