
अनेकदा झोपण्यासाठी मुलांच्या मागे लागावं लागतं. मुलं लवकर झोपावीत यासाठी शारीरिक मानसिक आरोग्यावर लक्ष देणं ही तितकंच महत्वाचं आहे.
दररोज एकाच वेळी झोपण्याचा दिनक्रम निश्चित करा. असे केल्याने शरीर वेळ येताच झोपायला तयार होते. जर तुमच्या मुलांनी झोपण्याची वेळ वारंवार बदलली तर त्यांना झोपेचा त्रास होऊ शकतो.झोपण्याआधी मुलांना रिलॅक्स करण्याची सवय ठेवली तर त्यांना चांगली झोप येते. यासाठी रात्री अंघोळ करण्याची, पुस्तकं वाचण्याची, चांगली गाणी ऐकण्याची सवय ठेवा.जर तुमचं मूल ५ वर्षांपेक्षा मोठे असेल तर दुपारी झोपण्याची सवय लावू नका. दिवसा २० मिनिटं दरी झोप घेतली तरी तब्येतीवर परिणाम होतो आणि रात्री लवकर झोप येत नाही. मुलं झोपली असतील तेव्हा खोलीत आवाज नसावा. आरामदायक वातावरणात बेडवर मुलांना झोपवा. त्यांच्या खोलीत लॅपटॉप, मोबाईलचा आवाज किंवा उजेड असेल तर झोप व्यवस्थित लागत नाही.
