बाल हक्कां बाबत संवेदनशील असने गरजेचे…ॲड.सुशिबेन शहा

सायबर महाविद्यालयात आयोजित बाल हक्क आयोग आणि युवकांची भूमिका या विषयावरील संवाद कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शहा, छायाचित्रात डावीकडून डॉ. दीपक भोसले ॲड.नीलीमा चव्हाण श्री. चैतन्य पुरंदरे, ॲड. जयश्री पालवे सौ. सायली पालखेडकर व ॲड. संजय सेगर दिसत आहेत.

कोल्हापूर: सायबर महाविद्यालयांमध्ये बालहक्क आयोग आणि युवकांची भूमिका या विषयावर युवकांशी संवाद साधतांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड .सुशिबेन शहा यांनी वरील उद्गगार काढले.

बाल हक्क आयोगाची कार्य पद्धती विषद करताना त्यांनी बालकांच्या शोषणा विषयी त्यांनी विविध उदाहरणे देऊन अशा घटना जर समाज व पर्यायाने संवेदनशील युवक यात मोठी भूमिका बजावतअसल्याचे सांगून बाल हक्क आयोगातर्फे मुलांसाठी हेल्पलाइन तयार केली गेली असून या मार्फत देखील बालकांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवता येऊ शकतो असे नमूद केले. दुर्दैवाने आजही बालकांच्या विकासात्मक गोष्टींवर अधिकचे काम होणे अपेक्षित असल्याचे सांगून या कामात लोकसभाग वाढवण्याचे त्यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात समाजकार्य विभागप्रमुख डॉ. दीपक भोसले यांच्या प्रस्ताविकेतून झाली.क्षेत्रिय कार्यामार्फत बालकांच्या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांमार्फत काम चालू असून येणाऱ्या काळात बाल हक्क आयोगाच्या मार्गदर्शनानुसार याबाबतची व्याप्ती वाढवनार असल्याचे सांगितले. सुरूवातीला सर्व मान्यवरांचे झाडाचे रोप व महात्मा गांधीजींवर पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बाल हक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी आपल्या मनोगतामध्ये डिजिटल प्रणालीचा वापर मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केला जात असल्याचे त्यांनी या प्रसंगी प्रामुख्याने नमूद केले.

या संवाद कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क सदस्य अॅड. नीलीमा चव्हाण,सदस्य अॅड संजय सेगर, अॅड जयश्री पालवे सौ. सायली पालखेडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील व शेखर तेली यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुरेश आपटे व आभार प्रदर्शन डॉ. दुर्गेश वळवी यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. कालिंदी राणभरे प्रा. महेंद्र जनवाडे प्रा. शर्वरी काटकर, विद्यार्थी प्रतिनिधी मोहन तायडे, दीपक तायडे, शिवानंद पोळ, पूजा दळवी व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे इत्यादी सहकार्य केले.

🤙 8080365706