महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना चित्रा वाघ यांनी सुनावले खडे बोल

हिंगणा: तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांची आतापर्यंत एकही बैठक जिल्हाध्यक्षांनी घेतली नाही, अशी ओरड महिलांनी केली. त्यामुळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे यांना प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खडेबोल सुनावले.

उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांचेही पक्ष संघटनेच्या विषयावरून चांगलेच कान टोचले. यामुळे या बैठकीची चर्चा रंगू लागली आहे.महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी महिला मोर्चा नागपूर जिल्हा व तालुका (मंडळ) कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नागपूर ग्रामीणमधील १३ तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची राज्यातील सर्व जिल्ह्यांत पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यानुसार महिला मोर्चा नागपूर जिल्हा व तालुका मंडळ महिला पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली परवा खरबी परिसरात पार पडली.

🤙 8080365706