नवरा, नवरीसह परतत असताना भीषण अपघात

लातूर : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. लग्न आटपून नवरा, नवरीसह परतत असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवरा, नवरी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ सकाळी हा अपघात घडला आहे. पुण्यावरून परतत असताना अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील लग्न समारंभ आटपून गावाकडे परतत असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन पलटी झाले. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.

🤙 8080365706