मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर…..

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्यामुळे गेल्या वर्षभरात एक लाखावर विद्यार्थी वाढले आहेत. शिवाय शिक्षणासाठी अनेक अद्ययावत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्यामुळे शिक्षण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय शैक्षणिक योजना’ एवं प्रशासन संस्थेकडून हा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी पालिकेने शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची निवड करण्यात आली आहे.पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून सन २०२२- २३ या वर्षात पटसंख्या वाढवण्यासाठी ‘मिशन ॲडमिशन’ मध्ये ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’ मोहीम राबवली. यामध्ये एक लाखांवर विद्यार्थी संख्या वाढली. यासह पालिकेच्या माध्यमातून शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा अहवाल राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता.

🤙 8080365706