पुरुषांनी किती मीठ खावे महिलांनी किती खावे?

मिठाशिवाय अन्न बेचव लागते. मात्र मीठ आहारात किती असावे, कुणी किती मीठ खावे याचे काही नियम असतात. जास्त मीठ खाणं तब्येतीला बरं नसतंच. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार एका व्यक्तीने दररोज ५ ग्रॅम किंवा त्यापेक्षाही कमी मीठ खावे. १५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांनी मिठाचे सेवन कमी करावे. मात्र पुरुषांनी किती मीठ खावे महिलांनी किती खावे? चला जाणून घेऊयात.

सर्वसाधारणपणे स्त्रिया आणि पुरुष समान प्रमाणात मीठ खातात, परंतु पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सॉल्ट सेंसिटिव्ह असतात. जेव्हा आपण जास्त मीठ खातो, तेव्हा शरीरात अल्डोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते, त्याचा रक्तदाबावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत महिला आणि पुरुष दोघांनीही मीठ कमी खावे. पण स्त्रिया सॉल्ट सेंसिटिव्ह असल्यामुळे त्यांनी दररोज किमान ५ ग्रॅमपेक्षाही कमी मिठाचे सेवन करावेमहिला आणि पुरुष दोघांनीही आठवड्यातून एकदा बिन मीठाचे पदार्थ खावेत. यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण नियंत्रित राहते. खाण्याव्यतिरिक्त बरेच लोक स्नॅक्स किंवा इतर खारट पदार्थ खातात, ज्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण जास्त वाढते. अशा परिस्थितीत खारट स्नॅक्स टाळावेत.

🤙 8080365706