
साके : राष्ट्रीय कॅांग्रेसला 2019 च्या लोकसभेच्या निवडणूकीत 11 कोटी मते मिळाली होती. व सुमारे 50 खासदार निवडून आले होते. या देशामध्ये 9 ते 10 राज्यामध्ये क्षेत्रीय पार्ट्याचे वर्चस्व असून सुमारे 200 हून अधिक जागा ह्या क्षेत्रिय पार्ट्या निवडून आणू शकतात. व कॅांग्रेसच्या सह्याने केंद्रात सरकार बनवू शकतात.पण कॅांग्रेसच्या गांधी घराण्याला एकदा संपवल्यास किंवा निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर काढले तर देशावर पाच पन्नास वर्षे राज्य करायला आपण मोकळे आहोत. या उद्देशाने दिर्घकाळ नियोजन करून राहूल कांधी यांनी कर्नाटकमध्ये केलेले वकतव्य निरव मोदी आणि ललीत मोदी यांना उद्देशून सगळे मोदी चोर आहेत असं म्हंटल्याच्या वक्तव्याचा संदर्भ घेवून सुरतच्या आमदारा कर्वी फिर्याद दाखल करून सुरत कोर्टाने खासदारकी रद्द होण्याला आवश्यक 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हि शिक्षा 2 वर्षाचीच कशी ? 2 वर्षाची शिक्षा द्यायची हे कुठल्या कायद्यात आहे. केवळ सुडबुद्धीचे राजकारण करून सत्तेच्या भीतीपोटीच भाजपाने राहूल गांधींना मज्जाव करण्याचे षडयंत्र रचलेले आहे असा अरोप माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला.
केनवडे फाटा ता.कागल येथे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे निषेधार्थ मविआ तर्फे भाजपाचा जाहिर निषेध प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृवाखाली मविआ तर्फे भाजपा व ईडी विरोधात तिव्र निदशर्ने करण्यात आली. लोकशाही दडपू पाहणा-या भाजप सरकारचा… धिक्कार असो… सुडबूध्दीने ईडी कारवाई करणा-या भाजप सरकारचा निषेध करत भाजपा विरोधी घोषणा देण्यात आल्या तसेच ,राहूल गांधी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ,उद्धव ठाकरे यांचा विजय असो. अशा घोषणांनी कार्यकत्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको केला आंदोलनस्थळी कागल पोलिसांनी बंदोबस्त तैवात केला होता.
घाटगे पुढे म्हणाले, देशातील नागरिकांच्या उपयोगासाठी बनवली गेलेली ईडी सारखी यंत्रणा सत्तेचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. यामुळेच आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख्या लोककल्याणकारी नेत्याला जाणीवपुर्वक टार्गेट केले जात आहे. एवढा देश पाचव्या क्रमांकावर नेला म्हणून टिमक्या बडवताना भाजपच राज्य येण्याअधी 9 व्या क्रमांकावर देश कोणी नेला होता आणि स्वातंत्र्य काळामध्ये असलेले दुख,दारिद्र्य ,उपेक्षा ही कमी करण्यामध्ये कॅांग्रेसचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, धनराज घाटगे, द्त्ता पाटील (केनवडे), विश्वास दिंडोर्ले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शिवसिंह घाटगे, ए.वाय.पाटील, एम. बी.पाटील, काका सावडकर बाबुराव शेवाळे, के.के.पाटील, अमर कांबळे, बाजीराव पाटील (केनवडे), अरूण पोवार आदी मविआचे कार्यकर्ते उपस्थीत होते. आभार महेश पाटील यांनी मानले.
