खासदार श्रीकांत शिंदेंचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करणार : राजेश क्षीरसागर

खासदार श्रीकांत शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे उद्या दि.२६ मार्च २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, खासदार श्रीकांत शिंदे यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, खासदार श्रीकांत शिंदे प्रथमच कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे कोल्हापूरात आगमन झाल्यानंतर ते दुपारी ३.३० वाजता शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट देणार आहेत. या ठिकाणी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी अशा पद्धतीने जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी महिला पदाधिकारी यांच्यावतीने औक्षण करण्यात येणार आहे. यानंतर ते शिवालय येथे पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

या बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, युवा सेनेचे प्रसाद चव्हाण, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706