कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना जारी….

मुंबई : कोरोनाव्हायरस आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत.या अ‍ॅडव्हायझरीमध्ये लोकांना कोविडसाठी निश्चित केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या आणि बंदीस्त ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/ टिश्यू वापरण्यास सांगितले आहे. स्वच्छता राखण्यासाठी साबणाने किंवा वारंवार हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, टेस्टींग आणि लक्षणांबद्दल लवकर माहिती देण्यास सांगितले आहे. यासोबतच श्वसनाचे आजार असल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता, 10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर याला सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

🤙 8080365706