
बालिंगा: बालिंगा तालुका करवीर येथे बालिंगा गगनबावडा रोडवर करवीर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांसमोर बोलताना काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका करून देश हुकुमशाही कडे जात असल्याबाबत खंत व्यक्त केली. यावेळी युवक काँग्रेस करवीरचे तालुकाध्यक्ष योगेश कांबळे वाशिकर तसेच उपाध्यक्ष स्वप्नील पाटील कोगेकर तसेच युवा काँग्रेसच्या वतीने घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळी अर्धा तास वाहतूक बंद होती .
