शासकीय मोफत आरोग्य शिबीर एक स्तुत्य उपक्रम: प्राध्यापक बीजी मांगले

बालिंगा: खाजगी डॉक्टरांचे आरोग्य शिबिर खूप पाहिले पण शासकीय मोफत आरोग्य शिबीर आज प्रथम पाहत असून तो एक स्तुत्य उपक्रम आहे असे उदगार जागर फाउंडेशनचे प्राध्यापक बी.जी. मांगले यांनी काढले.

बालिंगा तालुका करवीर येथे नुकतेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोच्च रुग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कात्यांयनी दूध संस्था बालिंगा येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी बोलताना प्राध्यापक बि.जी. मांगले यांनी खाजगी शिबिराचे व शासकीय शिबिराचे फायदे व तोटे यांचे विवेचन केले खाजगी शिबिर ज्यावेळी घेतले जाते त्यावेळी खाजगी रुग्णालय तुडुंब भरून राहतात परंतु समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा करणेचे काम हे शासकीय मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून आयोजकाने अत्यंत चांगले काम केले आहे.

तसेच यावेळी बोलताना जिल्हा परिषदचे अमर पाटील यांनी सुद्धा या शिबिराबाबत गौरव उद्गार काढले.या शिबिरामध्ये जवळजवळ 200 रुग्णांवर उपचार करण्यात आले, यामध्ये कान नाक घसा, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, तसेच नेत्र तपासणी इत्यादी रोगावरती उपचार करण्यात आले.

यादरम्यान डॉक्टर विशाल बाजड तसेच समन्वयक कृष्णात लोंढे पत्रकार पुंडलिक पाटील मोहन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत नंदकुमार जांभळे यांनी केले तर सूत्रसंचालन मोहन कांबळे यांनी केले आभार प्रदर्शन धनंजय ढेंगे यांनी मांडले.

यावेळी संयोजक धनंजय ढेंगे प्रकाश, जांभळे, अजित कांबळे, अजय वाडकर, विकास जांभळे, संभाजी जांभळे, सचिन माळी, महेश ढेंगे, युवराज वाडकर, आनंदा जाधव, अजिंक्य कोरे, सचिन बुडके, रोहित वागवेकर, राजेंद्र चव्हाण इत्यादी संयोजक उपस्थित होते.

🤙 8080365706