देवगड हापूसला १२०० रुपये प्रतिडझन भाव

देवगड: राज्यासह देश विदेशात मागणी असलेल्या देवगड हापूस आंब्याला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. देवगड हापूसला प्रति डझन १२०० रुपये भाव मिळत आहे.

मागच्या वर्षी अवकाळी आणि फळमाशीने ग्रासलेल्या हापूसचे यंदा चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मार्च संपत आला तरी अपेक्षित उत्पादन न झाल्याने देवगड हापूसचे दर प्रतिडझन १००० ते १२०० रुपयांवर स्थिरावला आहे. उत्पादन कमी असल्याने हाच दर पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

🤙 8080365706