प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी चालूच; मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी चालूच असून आज प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली आहे.

ही बैठक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या मुद्यावर असून या बैठकीत जिल्हा पातळीवरील प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी सुद्धा चर्चा झाली आहे. या बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा झाली असून काही धोरणात्मक प्रश्नांची सोडवणूक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीतच होऊ शकते, या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठकीसाठीची विषय पत्रिका तयार करण्याच्या तयारीची सुध्दा होती.

या बैठकीसाठी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह संतोष गोटल, मारुती पाटील, डी. के. बोडके आणि सातारा व सांगली जिल्ह्यातील श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी गेले असून बैठक सविस्तर व चांगले निर्णय झाले असे समजले असून, उद्या दु. ४ वा. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर येऊन माहिती देणार आहेत.

बैठक चांगली झाली व मंत्रालय पातळीवरील प्रश्न सुटले तरी जिल्हा पातळीवरील प्रश्ना बाबतीत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही, म्हणून जिल्हा पातळीवरील प्रश सुटल्या शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलनात बसलेल्या स्त्री-पुरुष जनतेने निर्धार केला आहे.

🤙 8080365706