
पुणे: पुणे महापालिकेचा २०२३-२४चा अर्थसंकल्प आज आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला.
पुणे महापालिकेचे २०२३-२४ वर्षासाठी साठी ९ हजार ५१५ कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर कोणतीही करवाढ केली नसल्याचे बजेटमधून दिसून आले आहे. हे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केले जाणार होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे अर्थसंकल्प सादर करता आले नाही.
आज अखेर अर्थसंकल्पाला मुहूर्त लागला. आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेच्या २०२२-२३चा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटींचे सादर केले होते. त्यामध्ये ४ हजार ८८१ कोटींची महसुली कामे, तर ३ हजार ७१० कोटी भांडवली प्रस्तावित केली होती. २०२१-२२ आयुक्तांनी ७ हजार ६५० कोटीचे अर्थसंकल्प तयार केले होते. यात हजार कोटीची वाढ केली होती.
