
मुंबई : मुंबईत राविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ६०% बस रस्त्यावर उतरवल्या जातात. पण आता १ एप्रिलपासून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांना अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून नव्या पॅटर्ननुसार आता ८०% बस उतरवल्या जाणार आहेत.
मुंबई मध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ४०% टॅक्सी, रिक्षा देखील उतरवल्या जात नाहीत. यामुळे अनेकदा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मध्ये समस्या येतात. खाजगी क्षेत्रात काम करणार्या अनेकांना यामुळे प्रवासात अडथळे येतात. त्यामुळे बेस्ट कडून मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करता नवे पॅटर्न डिझाईन करण्याचा विचार करण्यात आला आहे. हा नवा पॅटर्न एप्रिल महिन्यापासून राबवला जाणार आहे.
