सुदृढ गाव योजने अंतर्गत म्हारूळ येथे सरपंच सौ रूपाली मोहन चौगले यांच्या शुभ हस्ते रूग्णालयाचे उद्घाटन

बहिरेश्वर: म्हारुळ ता.करवीर येथे मेरीड इंडिया संचलित सावली सदृढ गाव योजना व ग्रामपंचायत म्हारूळ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे म्हारुळ य़ेथे अल्पदरात सेवा रुग्णालयाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ रुपाली चौगले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सरपंच म्हणाल्या की आपल्या गावापासून जवळपास तीन किलोमीटरवर सांगरूळ येथे सरकारी दवाखाना असून नागरिकांना उपचार घेण्यासाठी अजून पायपीट करावी लागते किंवा खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.पैशाअभावी उपचार न झाल्याने रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरपंच यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सावली केअर सेंटर अंतर्गत अल्प दरात म्हणजे मासिक 60 रुपयांमध्ये एक महिना उपचार व वार्षिक 365 रुपये मध्ये एक वर्ष उपचार अशा पद्धतीने जवळपास मोफत उपचार या पद्धतीने गावामध्ये दवाखाना उभारण्याचे ठरविले व डॉक्टर किशोर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या सेवा रुग्णालयाचे उद्घाटन केले.अशा प्रकारचे संपुर्ण भारतातील ग्रामपंचायत ने चालवलेले हे तिसरे रुग्णालयात आहे.संपुर्ण पंचक्रोशीतील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.सरपंच यांनी यावेळी केले.

चौगले सर यांनी आपल्या मनोगतात प्रशासनाने म्हारूळ गाव सर्व शासकीय सुविधा पासून वंचित ठेवले असलेच आरोप केला. गावची लोकसंख्या 3000 च्या वर असून गावात शासकीय रूग्णालय नाही,बॅंक नाही,पोष्ट आॅफीस नाही, माध्यमिक शाळा नाही या सर्व सोयीसाठी बहिरेश्वर किंवा सांगरुळ या गावाचा आधार घ्यावा लागतो. असा घणाघात प्रशासनावर केला पण आज सावली केअर सेंटर ने अगदी अल्पदरात उपचार करणारे रुग्णालयात स्थापन करून समस्त म्हारूळ वासियांना मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल सावली केअर सेंटर चे आभार मानले.तसेच सर्व सन्माननीय सदस्यांनी पाठपुरावा करून रूग्णालय सुरु केलेबद्दल सर्व उपस्थित ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.

यावेळी उपसरपंच सरदार पाटील सदस्य सागर चौगले राजाराम कुंभार प्रकाश कांबळे सौ वंदना म्हाकवेकर सौ अलका पाटील शालाबाई गुरव रेखा कुंभार ग्रामसेवक पी एस मेंगाणे तंटा मुक्ति अध्यक्ष रंगराव पाटील, आनंदराव शिंदे गुरुजी, एकनाथ चौगले ,एन के पाटील ,राजाराम पाटील ,भैरु पाटील, वसंत पाटील तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी दूध संस्था कर्मचारी संघटना तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विशेष सहकार्य म्हणून कृष्णा चौगले, रघुनाथ कवडीक, तुकाराम चौगले, भगवान सुतार, बबन कुंभार ,अनिल पाटील यांनी काम पाहिले आभार रवींद्र चौगले यांनी मांनले.

🤙 8080365706