
हार्मोन्समध्ये होणारे चढउतार आणि त्यामुळे महिलांचे सतत होणारे मूड स्विंग यांमुळे हा ताण वाढत असल्याचे दिसते. विविध शारीरिक बदलांमुळे महिलांना ताण जास्त प्रमाणात येतो. पण काही गोष्टी नियमितपणे केल्यास महिला आपला हा ताण कमी करु शकतात. या गोष्टी कोणत्या ते पाहूया.
ताण घालवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. शारीरिक हालचाल झाली की शरीरात एन्डोर्फिन हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे मेंदूमध्ये आनंद देणाऱ्या भावना निर्माण होतात. तसेच व्यायाम केल्याने चांगली झोप येते, एनर्जी लेव्हल सुधारते आणि मूडही चांगला होतो. आपल्याला सतत लहानसहान गोष्टीचा ताण येत असेल तर मेडीटेशन करणे हा त्यावरील एक उत्तम उपाय आहे. यामुळे ताण, भिती या गोष्टी नकळत कमी होतात आणि आपल्याला रिलॅक्स वाटण्यास मदत होते. झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पण महिलांना अनेकदा लहान मुले, घरातील काम, इतर ताणतणाव यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. पण रात्रीच्या वेळी किमान ७ ते ८ तासांची झोप मिळाली तर आपल्याला आलेला ताण कमी होण्यास याची निश्चितच चांगली मदत होते.आपण घर, संसार, ऑफीस या गोष्टींमध्ये इतके अडकून जातो की आपला बाहेरच्या जगाशी असणारा कनेक्ट हळूहळू कमी होत जातो. पण मित्रमंडळी, नातेवाईक यांना थोडा वेळ दिला आणि काही सोशल अॅक्टीव्हिटीजमध्ये किंवा आपल्या छंदांसाठी वेळ दिला तर आपला
