
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?
मेष आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल.
वृषभ नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे.
मिथुन जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवास निरर्थक ठरतील.
कर्क शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल.
सिंह कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडांकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.
कन्या रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दूरचा प्रवास घडेल. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.
तूळ व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणूक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील.
वृश्चिक व्यावसायिक भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. व्यवहारचातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग राहा.
धनु मनावर संयम ठेवून राहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.
मकर व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल.
कुंभ आज वाहन, घर खरेदीचा योग आहे. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे.
मीन कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळा.
