
मुंबई :.राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात काढली जाईल. तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील कृषी सहाय्यकांच्या रिक्त असलेल्या पदासंदर्भात मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात कृषी सहाय्यकांची २११५ पदे रिक्त आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे मुख्य काम तसेच कृषी क्षेत्रातील ४० ते ५० योजनांचे उदिष्ट त्यांना दिलेले असते.
