राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत जातीय तेढ निर्माण केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाजीक रजाद सैय्यद असं तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात त्यांनी हिंदू-मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित केला. भारताला धर्मांध लोक नको तर धर्माभिमानी लोक हवेत असं वक्तव्य केलं. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी भाषणात भारतात कसा मुसलमान हवा हेदेखील सांगितलं. त्यांनी मुसलमानांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामांवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या सगळ्या कारणावरुन हिंदू मुस्लिम असा तेढ निर्माण होईल आणि म्हणून गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे.

🤙 8080365706