सोन्याच्या चांदीच्या दरवाढीला ब्रेक….

दिल्ली : सोन्याच्या चांदीच्या दरवाढीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.गुरुवारी सोन्यात मोठी घसरण झाली. त्यापाठोपाठ चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर शुद्ध सोने आणि चांदीचा भाव स्वस्त झाला.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात आज जबरी घसरण झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 800 रुपयांची घसरण झाली. आज सकाळी हा भाव 54,350 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोने आज स्वस्तात खरेदी करता येईल. आज हा भाव 59,280 रुपये आहे. तोळ्यामागे 870 रुपयांची घसरण झाली. चांदी किलोमागे 500 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 71,600 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नाहीत. हे सकाळचे भाव आहे. शहरानुसार भावात तफावत आहे.

🤙 8080365706