
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ६ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिंदे एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितलं जात होत.जानेवारी महिन्यात अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी एकनाथ शिंदे आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
